महाराष्ट्र

Kirit Somaiya File complaints Against Dhananjay Mune At ED office सामाजिकन्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्यांची ED कडे तक्रार

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – भ्रष्टाचारी नेत्यांची झोप उडवणारे आणि निर्भीडपणे आरोप करून भ्रष्टाचारची पोलखोल करणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकासआघाडी सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात ED कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी महाविकासआघाडी सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका साखर

कारखान्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. धनंजय मुंडे यांनी मृत व्यक्तीचे अंगठे घेऊन कारखान्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ED कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, FIR च्या पाठपुराव्यासाठी किरीट सोमय्या बीड जिल्ह्यातील जगमित्र शुगर आणि बर्दापूर पोलीस स्टेडानला भेट देणार आहेत.

सुप्रीम कोर्टाने मागील आठवड्यात धनंजय मुंडे आणि जगमित्र शुगर मिल्स लि. विरुद्ध बर्दापूर पोलीस स्टेशन, बीड येथे नोंदवलेली FIR रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली SLP नाकारली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणात 25 कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय हजारो शेतकरी, भागधारक, सरकार, शेतकऱ्यांसह देवस्थानच्या जमिनी बळकावळ्याचाही आरोप सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.

 

Most Popular

To Top