महाराष्ट्र

लातूर मधील लॉज मालकाने खून करून केली आत्महत्या !

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहरातील जुना रेणापूर नाका येथील ऐका जाहिरात लोखंडी फ्रेमला एकाने फाशी घेऊन आत्महत्या केली होती हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत लातूर शहरातील साई नाका येथील साईधन लॉजमध्ये मालकाची आत्महत्या तर एकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.लॉज मध्ये खून झालेल्या व्यक्तीचे नाव उमेश रमेश देशामुख

असं आहे तर साईधन लॉज मालक शिवाजी दगडू शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी
पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. लातूर पोलिसांनी या प्रकरणात अंदाज वेक्त केला आहे. साईधन लॉज चालवत असलेल्या शिवाजी शिंदे यांनी आत्महत्या करण्याआधीच उमेश देशमुख याचा खून केला आणि नंतर तिसऱ्या मजल्यावर गळफास घेउन आत्महत्या केली आहे. लॉज मालक शिवाजी शिंदे यांची

चुलत पुतणी ही उमेश देशमुख याची पत्नी आहे. उमेश देशमुख काही दिवसांपूर्वी लातूरला आला होता . प्राथमिक माहितीनुसार,उमेश देशमुख हा नेहमी आपल्या पत्नी सोबत सतत भांडत आणि मारहाण करायचा. या विषयी
विचारलं असता शिवाजी शिंदे आणि उमेश देशमुख यांच्या मध्ये वाद झाला असावा. सगळ्यात धक्कादायक
बाब म्हणजे दोघांनी एकत्र बसून रात्री दारू प्यायली आणि

त्याच नशेत हा खून झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यापुढे अधिक तपास सुरू असल्याची माहिती DYSP जितेंद्र जगदाळे यांनी दिली. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. मयत उमेश देशमुख आणि शिवाजी शिंदे या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेउन ते शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. तरी विवेकानंद चौक पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Most Popular

To Top