महाराष्ट्र

काका – पुतण्याच्या चढाओढीच्या राजकारणाला आदर्श ठरणार , दिलीपराव देशमुख यांचा राजकारणातील लातूर पॅटर्न

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – देशात आणि राज्यात काका-पुतण्यामधील कुरघोडीचे राजकारण आणि त्याची पंरपरा अनेक क्षेत्रात सुरू असतांना आपण पाहतो. पण मराठवाड्यातील लातूर जिल्हा आणि देशमुख कुटुंब त्याला अपवाद ठरले आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधु माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारणातल्या वेगळ्याच लातूर पॅटर्नचे दर्शन घडवले. तरुणांच्या हाती नेतृत्व सोपवण्याचे केवळ भाषणात सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पुतण्या आमदार धीरज देशमुख यांना थेट लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर बसवले. काका-पुतण्यामधील या आगळ्या- वेगळ्या राजकारणातील लातूर पॅटर्नची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे.

लातूर जिल्हा निर्मितीनंतर जिल्हा बँकेवर देशमुख कुटुंबाचेच वर्चस्व राहिले. उस्मानाबाद जिल्हा बँकेत संचालक राहिलेले विलासराव देशमुख पुढे आमदार झाले, लातूर जिल्हा वेगळा झाला आणि बँकेची सुत्र त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख यांच्या हाती आले . विलासराव देशमुख राजकारणात जसजसे मोठ्या पदावर गेले तसं जिल्ह्यातील राजकीय सत्ता केंद्र दिलीपराव देशमुख यांच्याकडे आले. अर्थात दोन भावांमध्ये असलेल्या समन्वयामुळे जिल्हा बँक असो की संघटने संदर्भातील विषय निर्णय एकमतानेच घेतले जायचे .

विलासराव देशमुख उस्मानाबाद जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते, पण त्यांना अध्यक्षपद मात्र लातूर जिल्हा बँक स्वंतत्र झाल्यानंतरही भुषवता आले नाही. ते विधानसभेवर निवडून गेल्यानंतर 1986 ते 1992 ही सहा वर्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मात्र अध्यक्षपद भुषवले. सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव आणि संचालक मंडळ, प्रशासनावरील पकड या जोरावर त्यांनी लातूर जिल्हा बँकेला राज्यातील एक अग्रगण्य सहकारी बँक म्हणून लौकिक प्राप्त करून दिला.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुढे अमित देशमुख आणि आता धीरज देशमुख या दोन्ही आमदार बंधूंचे राजकारण देखील जोमाने सुरू आहे. आतापर्यंत लातूर जिल्हा बँकेला 13 अध्यक्ष लाभले. अर्थात त्यांचे खरे सुत्रधार हे विलासराव आणि दिलीपरावच होते हे लपून राहिले नाही. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर दिळीपराव यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांना सुरक्षा कवच द्यावे, अशा पद्धतीने घडवले. राजकारणात कधी, कुठे थांबावे याचे उत्तम टायमिंग साधत दिलीप देशमुख यांनी जिल्हा बँकेचा मुहूर्त निवडला. लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेल्या पुतणे धीरज यांच्यावर जिल्हा बँकेची देखील जबाबदारी सोपवत त्यांना सहकारात पारंगत करण्याच्या

दृष्टीने टाकलेले हे काका दिळीप देशमुख यांचे हे पहिळे पाऊल होते. विलासराव देशमुख हे जिल्हा बँकेत संचालक झाले, त्यानंतर विधानसभेवर निवडून गेले, तर धीरज देशमुख आधी आमदार झाळे आणि मग जिल्हा बँकेवर संचालक आणि आता चेअरमन झाले. लातूर जिल्हा बँकेवर सातत्याने वर्चस्व मिळवत देशमुख कुटुंबाने विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याचे यावेळीही दिसून आले. राज्यातील इतर जिल्हा बँकेच्या संचालक आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेळे चढाओढीचे राजकारण एकीकडे तर लातूर बँकेच्या चेअरमन पदी आमदार धिरज देशमुख आणि व्हाईस चेअरमन पदावर जाधव यांची झालेली बिनविरोध निवड एकीकडे.

Most Popular

To Top