महाराष्ट्र

महापरीनिर्वाण दिनी धनंजय मुंडे यांना अशोकरत्न आणि अमित देशमुख, संजय बनसोडे यांना अशोक विभूषण पुरस्काराने सन्मानित करणार

महाराष्ट्र खाकी ( पुणे ) – लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे डॉ. अशोक शिलवंत यांच्या संकल्पनेतून नववा अशोक स्तंभ उभारला आहे. याच ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थि स्थापित आहेत. या अशोक स्तंभाचा लोकार्पण सोहळा अशोक सर्वांगीण सोसायटी, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.6 डिसेंबर महापरीनिर्वाण दिन रोजी होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते होईल.

कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख हे असणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर श्रृंगारे उपस्थित राहणार आहे. आग्रा येथील सहावी धम्मसंगितीचे अध्यक्ष आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकचे संस्थापक अध्यक्ष व्ही. के. आचार्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या सदस्या नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर या स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती संयोजक ॲड. राजरत्न शिलवंत यांनी दिली.

या मान्यवरांना मिळणार पुरस्कार
अशोकरत्न पुरस्कार : धनंजय मुंडे, अशोक विभूषण पुरस्कार : अमित देशमुख, संजय बनसोडे, अशोक भूषण पुरस्कार : परिमल निकम, अशोक मित्र पुरस्कार : फिरोज मणियार, जब्बार अहेमद शेख, संघमित्रा पुरस्कार : मंदाकिनी गायकवाड, कलावती आचार्य, कलिंदा किवंडे, अशोक सांस्कृतिक सेवा पुरस्कार : गायक पवन घोडके, नंदु खंडागळे, अशोक काव्यभूषण पुरस्कार : कवी अरुण पवार, धम्मसेवक पुरस्कार : शरण शिंगे, तुकाराम लामतुरे, मयुर बनसोडे, महेंद्र पुरस्कार: विशाल कांबळे, प्रा. बापू गायवाड, डी.एस.नरशिंगे अशी पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे आहेत.

Most Popular

To Top