महाराष्ट्र

आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील शाळेला अचानक भेट देऊन गैरजिम्मेदार शिक्षकांना दिला झटका

महाराष्ट्र खाकी (औसा) – लातूर जिल्ह्यातील सर्व आमदारा पैकी असे एकमेव आमदार अभिमन्यू पवार आहेत कि ज्यांनी सर्वाधिक वेळ आणि लोकउपयोगी कामे आपल्या मतदारसंघात आणली आहेत. अभिमन्यू पवार यांच्या कार्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची झलक मतदारसंघातील नागरिकांना मागील दोन वर्षात दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी पालकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर कासार सिरसी येथील शाळेची औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अचानक पाहणी केली असता विना परवानगी गैरहजर असलेल्या शिक्षकांना गटशिक्षण अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

काही दिवसांपूर्वी पालकांनी शिक्षक शाळेत गैरहजर राहत असल्याची माहिती मला दिली होती. त्या अनुषंगाने आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार सिरसी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची अचानक भेट देऊन पाहणी केली तसेच मस्टरसर इतर दस्तावेजांची तपासणी केली. यावेळी विना परवानगी दोन शिक्षक गैरहजर असल्याचे आढळले, आमदार अभिमन्यू पवार शाळेत दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते दोन्ही शिक्षक धावतपळत आले. या गंभीर घटनेचा पंचनामा करायला लावून माहिती त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहचवल्यानंतर दोन्ही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

‘जवळपास दिड वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकत्याच शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गाडे/दिनचर्या/शिस्तबद्ध जीवनशैली लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा’ अशा सूचना शिक्षकांना दिल्या. किमान माझ्या मतदारसंघात तरी असे प्रकार खपवून घेणार नाही याची संबंधित सर्वांनीच नोंद घ्यावी असा सज्जड दम आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला.

Most Popular

To Top