महाराष्ट्र खाकी (लातूर) – नुकतेच महाराष्ट्र सरकारला म्हणजे महाविकासआघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने राज्यातील नेतेमंडळींनी सरकारच्या दोन वर्षांच्या कारभारावर आपले मत वेक्त केले त्यातील एका भाजपच्या युवा नेत्या प्रेरणा होनराव यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कारभारावर रोख ठोक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. प्रेरणा होनराव या भाजप च्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट आहेत. प्रेरणा होनराव यांनी बऱ्याच tv न्यूज चॅनल वरील चर्चा सत्रात भाजपाची बाजू प्रखरपने मांडत असतात. प्रेरणा होनराव यांना मागील चर्चासत्रात बऱ्याच दिग्गज नेत्यांना विशेषता शिवसेनेच्या निलम गोरे आणि काँग्रेस चे राजू वाघमारे यांना चर्चे मध्ये निरुत्तरीत केले होते.
सरकारच्या दोन वर्षपूर्ती आणि कारभार यावर बोलताना अनेक मुद्यांना हात घातला आहे आणि जनतेला या झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे आवाहन केले. प्रेरणा होनराव बोलताना म्हणाल्या की या सरकारला जनतेने निवडूनच दिले नव्हते, या सरकारने अनैसर्गिक युती केली आणि सरकार स्थापन केली, या सरकारने कोरोनाच्या काळात परिस्तिथी हाथाळण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे. कोरोनाच्या कठीण काळात ऑक्सिजन साठी जनता तडफडत होती तरी या सरकाराने काहीच केले नाही.
MPSC परीक्षेतील नियोजना अभावी युवा वर्गाचे जे हाल झाले ते सरकारला अशोभनीय होते, वैद्यकीय परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे जे हाल झाले, आर्थिक नुकसान, मानसिक त्रास झाला. हे सरकार या ठिकाणी अपयशी ठरले आहे. पुढे बोलताना प्रेरणा होनराव यांनी राज्यात होणाऱ्या महिलांवरील आत्याच्यारावर ही परखड मत आणि नाराजी वेक्त केली. मागील पाच वर्षांच्या तुलनेत या दोन वर्षांत हे सरकार आकार्यक्षम ठरले आहे.असे अनेक मुद्दे प्रेरणा होनराव यांनी आपल्या व्हिडिओ मधून जनतेसमोर मांडले आहेत.