पोलीस

लातूर LCB पथकाने साई मंदिरामधील दानपेटी फोडणाऱ्या चोरास 10,000/- रुपयांच्या मुद्देमाला सह केली अटक

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यात लातूर LCB ला चांगलेच यश येत आहे असे दिसून येत आहे. LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. असाच एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे आणि चोरास पोलिसी हिसका दाखवला आहे. लातूर MIDC पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या साई मंदिरातील दानपेटी फोडून चोरी प्रकरणातील संशयित आरोपी बार्शीरोड लगत इदगाह मैदानाच्या परिसरातील एका कोपऱ्यात बसलेले आहेत.

अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने ईदगाह परिसरातील गोपनीय माहिती मध्ये मिळालेल्या ठिकाणी छापा मारला असता पोलिसांची चाहूल लागताच संशयित चोरा पैकी एक चोर भिंतीवरून उडी मारून पळून गेला. दुसऱ्या चोरास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव गणेश श्रीकांत साळुंखे, वय 22 वर्ष, राहणार कैलास नगर, लातूर असे असल्याचे सांगितले.
पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की,साई मंदिरातील दोन दानपेटी फोडून त्यामधील काही रक्कम आपले जवळ ठेवून उर्वरित रक्कम एका बॅगमध्ये ठेवून सदरची बॅग आत्ताच पळून गेलेला त्याचा मित्र विनायक भाऊसाहेब पवार, राहणार भामरी चौक, नांदगाव रोड, रेल्वेपटरीच्या शेजारी,

लातूर यांच्याकडे दिली होती असे सांगितले व या चोरी मधील चोरलेली रकमेपैकी नमूद आरोपी ने स्वतःजवळ ठेवलेली दहा हजार रुपये काढून दिल्याने ती रक्कम गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे. या आरोपीस पोलीस स्टेशन MIDC येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 769/2021 कलम 457,380 भा.द.वि मध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहेत. तसेच पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू असून फरार आरोपीस अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत .

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन,डीवायएसपी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.संजय भोसले,पोलीस अंमलदार- सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, नाना भोंग,चालक कांबळे यांनी बजावली.

Most Popular

To Top