लातूर ग्रामीण मतदारसंघातील रस्ते – पुलांच्या कामासाठी धिरज देशमुखांनी साडेतेरा कोटी रुपये मंजूर करून आणले

महाराष्ट्र खाकी ( रेणापूर ) – लातूर जिल्ह्याच्या विकासाठी देशमुख परिवार सतत प्रयत्नशील असते विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांचा विकासाचा वारसा धिरज देशमुख यांनी चालूच ठेवला आहे असे दिसते. लातूर ग्रामीण मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी धिरज देशमुख वेवगवेगळ्या मत्र्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना भेटत असतात आणि कामाचा पाठपुरावा करून मतदारसंघात विकास कामे करत आहेत. सध्या धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांची कामे नाबार्ड टप्पा 27 अंतर्गत मंजूर व्हावीत, यासाठी आमदार धीरज देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साडेतेरा कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे मतदारसंघात रस्ते व पुलाची कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्‍न आमदार धिरज देशमुख यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र देऊन अत्यंत खराब झालेल्या रस्ते व पुलांना प्राधान्याने मंजुरी द्यावी, अशी मागणी नुकतीच केली होती. या मागणीची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीने दखल घेत नवीन पुलांना व रस्त्याना मंजुरी दिली आहे.

रेणापूर तालुक्यातील तळणी- धवेली- जानवळ या रस्त्यासाठी 2 कोटी 75 लाख रपये, मुडेगाव- मोटेगाव- भोकरंबा – खानापूर – बिटरगाव- कारेपूर- रायवाडी या मार्गावरील पूल व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 4 कोटो तर नवीन कामासाठी औसा तालुक्‍यातील तेर- कोंड- भेटा- भादा या मार्गावर हळदुर्ग गाबाजवळ पुलाच्या बांधकामासाठी 2 कोटी 10 लाख रुपये, याच मार्गावरील भादा गावाजवळोल पुलाच्या बांधकामासाठी 1 कोटी 57 लाख रुपये आणि रेणापूर तालुक्यातील धानोरा- डिगोळ- पोहेरेगाव- आरजखेडा- साई या मार्गावर सिंदगाव गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी 3 कोटी 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

Recent Posts