देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टिका केले

महाराष्ट्र खाकी (अक्कलकोट) – राज्यात भाजप आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप दररोज सुरु आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्षांचे नेते सोडत नाहीत. दरम्यान, दिवाळीत धनंजय मुंडेंकडून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यकमात लावणीसह विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. याच कार्यक्रमावरून आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकक्लकोट इथे विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. 2 वरुन 302 वर गेलेली ही पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाही. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही.


एकीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकता हा प्रयत्न तुम्ही करा’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Recent Posts