महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – ‘संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजनेतंर्गत अबाल, वृद्ध, निराधारांना शासनाची मदत घरपोच देण्यात यावी, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सूचना लातूर ग्रामीण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीला केल्या.
तसेच त्यानुसार ‘संगांयो’ समितीने गावोगावी भेटी देऊन ‘संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना’ योजनेसाठी पात्र निराधारांची सर्व अर्ज प्रक्रिया गावातच करुन अर्ज दाखल करुन घेतली. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देण्यात येणाऱ्या मंजूरीच्या पत्राचे वाटप पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लातूर तालुक्यातील बोरी येथील पात्र निराधारांना करण्यात आले.
सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणची संजय गांधी योजना समिती लातूर तालुक्यातील निराधारांसाठी विविध उपक्रम राबवित आहे. अधिकाधिक निराधारांना योजनेत सहभागी होता यावे, यासाठी समितीने पालकमंत्री यांना केलेल्या विनंतीमुळे वयाच्या पुराव्यासंबंधी अट शिथिल करण्यात आली.
तसेच पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार कोरोनाचा वाढता प्रभाव असलेल्या काळात लातूर ग्रामीण संजय गांधी योजना समितीने गावोगावी सुसंवाद बैठका घेऊन निराधारांच्या शंकांचे निरसन केले व समाधान शिबीराच्या माध्यमातून कागदपत्रे व अर्जाची सर्व प्रक्रिया गावस्तरावर करुन घेतली. या प्रक्रियेचा भाग म्हणून पात्र निराधारांना योजनेचे मंजुरीचे पत्रही समितीच्यावतीने गावस्तरावरच दिले जात आहे.
तसेच मंजुरी पत्राचे वितरण बोरी येथे पालकमंत्री अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते पात्र निराधारांना करण्यात आले. यावेळी श्रीशैल उटगे, विजय देशमुख, संगांयो समितीचे अध्यक्ष प्रविण पाटील, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, सुभाष घोडके, दगडूसाहेब पडिले, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य हरीश बोळंगे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखरचे संचालक धनराज दाताळ, राजेसाहेब पाटील, सुनील पडिले,
उपसरपंच शंकरराव पाटील, सचिन दाताळ, सतिष पाटील, व्यंकटराव पाटील, कमलाकर अनंतवाड, प्रशांत मलवाडे, बालाजी मनदुमले, ज्ञानोबा गवळे, बोगदाद सगरे, अरूण वीर, बंडु पाटील, ज्ञानोबा शेंडगे, लिंबराज पाटील, परमेश्वर पाटील, नानासाहेब पाटील, बालाजी वाघमारे, ज्ञानेश्वर दाताळ, सिद्धेश्वर स्वामी, चंद्रकांत बर्चे, राजेश खाडप, बब्रुवान मलवाडे, शालिक थोरमोटे, काकासाहेब पाटील, मधुकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, निराधार उपस्थित होते.
ग्रामीण भागातील कोणताही निराधार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी लातूर ग्रामीण संजय गांधी योजना समितीने लोकाभिमुख अशा जनजागृती व सुसंवाद बैठका व समाधान शिबीर यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून निराधारांना दिलेल्या आधाराबद्दल प्रविण पाटील व लातूर ग्रामीण संगांयो समितीचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी कौतुक केले.