महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर महानगरपालिका मध्ये भाजपाने सत्ता प्रस्तापित केली. लातूरकरांनी प्रथमच भाजपच्या उमेदवारांना बहुमत दिले. त्यातील बरेच नगरसेवक नवीन चेहरे होते. त्यातील काहींनी या संधीचे सोने करत आपल्या वार्डातील नागरिकांच्या मानत आपल्या कामाने घर केले आहे त्यात बोटावर मोजण्याइतके नगरसेवक आहेत त्यातील एक म्हणजे वार्ड क्रमांक 11 च्या नगरसेविका रागिणी यादव आहेत. लातूर शहरातील त्या एकमेव अशा नगरसेविका आहेत की त्यांनी सर्वात जास्त वेळ नागरिकांच्या समस्या सोडवण्यात घातला आहे. असे वार्डातील नागरिक म्हणत आहेत. आणि याचाच फायदा पक्षाला होत असताना पुढील काळात नक्कीच दिसेल.
दोन दिवसापूर्वीच देशात 100 कोटी लसीकरणांचा टप्पा पूर्ण केला.कोरोनाशी लढताना,योग्य नियोजन व धाडसी निर्णयामुळे भारत देशाने 100 कोटींचा लसीचा टप्पा पार केल्यामुळे शहर महानगरपालिकेच्या प्रकाश नगर व इंडिया नगर येथील OPD तिल प्रभाग 11 व ईतर भागात सेवा देणाऱ्या आशा कार्यकर्त्या व आरोग्य विभागाच्या टीम सोबत आज केक कापुन त्याचा सन्मान करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.देश पातळीवरील या टप्प्यात शहर महानगरपालिकेचा देखील खारीचा वाटा नक्कीच आहे.सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज शुक्रवारी हा आनंदोत्सव साजरा केला,यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनीता कदम,डॉ.सौ.काझी,सौ.गुरसळे,नर्स गायकवाड, नर्स खाडे, नर्स जानते आदी उपस्थित होते.