महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर मनपाच्या सर्वसाधारण सभेत महिलानां मोफत सिटीबस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्यामुळे लातूर शहरातील 10 हजार रिक्षा चालकावर उपास मारीची वेळ आली असे मत लातूर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी वेक्त केले आहे. लातूर मनपा सत्ताधाऱ्याकडून निवडणूक लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला पण या निर्णयामुळे 10 हजार रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ येणार आहे असे अजित पाटील कव्हेकर म्हणाले, शहराचा विकास करण्यासाठी निर्णय घ्यावेत पण कोणावर अन्याय होऊ नये हे देघील पाहावे. लातूर हे छोटे शहर आहे येथील एका रिक्षा चालकांच्या मगे त्याचे परिवार असते या निर्णयामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. आधीच कोरोनामुळे लोकांची आर्थिक गणित बिघडले आहेत. अजित पाटील कव्हेकर यांनी हि गोष्ट लक्षात घेऊन रिक्षा चालकांसाठी आवाज उठवला आहे. मनपाच्या निर्णयाचे स्वागत सर्वांनी केले कारण त्यांनी एक बाजू पहिली पण अजित पाटील कव्हेकर यांनी दुसऱ्या बाजूचा विचार केला. अजित पाटील कव्हेकर नेहमी चुकीच्या निर्णयविरुद्ध आवाज उठवत असतात. जर हि गोष्ट यांच्या लक्षात आली नसती तर रिक्षा चालकांवर अन्याय झाला असता. अजित पाटील यांनी मनपाच्या या निर्णयाचे स्वागत केले पण दुसरी अन्याय कारक बाजू जनतेसमोर आणि मनपा समोर आणून दिली. अजित पाटील कव्हेकर यांनी या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्तित केले आहेत. कोणत्या महिलांना हि सेवा मिळणार आहे? या निर्णयामुळे मनपाच्या तिजोरीवर किती औझ येणार ? मनपा हा खर्च कसा करणार ? आणि सर्वसाधारण सभेत या विषयी काहीच माहीती का दिली नाही? आता मनपा याबद्दल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनपा रिक्षा चालकांसाठी काही उपाय योजना करेल का ?
लातूर मनपाने निर्णय घेताना कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, 10 हजार रिक्षा चालकांवर अन्याय का ? – अजित पाटील कव्हेकर
- Maharashtra Khaki
- October 22, 2021
- 7:17 am
Recent Posts