लातूर जिल्हा

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या विकसित लातूरच्या दृष्टीकोनातून एक पाऊल,जटायू कचरा संकलन मशीन मनपात दाखल

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार अगोदरपेक्षा अधीक पारदर्शक आणि आधुनिक पद्धतीने होत असताना लातूरकरांना दिसून येत आहे. आपल्याला कार्यातून लातूर शहराचे नाव लौकिक करण्याचे काम विक्रांत गोजमगुंडे करत आहेत. लातूर शहर स्वच्छ कसे राहील यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे सतत प्रयत्नशील असतात याचाच एक भाग म्हणून लातूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सफाई करण्यात वेगवेगळ्या उपकारणाचा उपयोग होत असतो. घनकचरा व्यवस्थापनात मानवी हाताळणी कमी करण्यादृष्टीने एक पाऊल. लातूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकरीता घेण्यात आलेल्या आत्याधूनिक जटायू कचरा संकलन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मशीनचे प्रत्यक्षिकही पाहण्यात आले. वेळेची व मनुष्यबळाची बचत होण्यासाठी जटायू मशीनचा उपयोग होणार आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापनात मानवी हाताळणी कमी होवून स्वच्छता कर्मचारी यांना याचा लाभ होणार आहे तसेच शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी देखील मदत होईल.

Most Popular

To Top