महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहर महानगरपालिकेने पार्किंगची योग्य व्यवस्था केली नाही म्हणजे पार्किंग, नो पार्किंगचे फलक लावले नाहीत, रोडच्या साईडला पाट्या नाहीत जिथे आहेत तिथे गाड्या बसत नाहीत आणि जिथे आहेत तिथे पाट्या दिसत नाहीत आणि त्यात टोईंग च्या माध्यमातून नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट व टोईंग कर्मचाऱ्यांकडून लातूरच्या सर्वसामान्य नागरीकांना उद्धट,अरेरावीची भाषा आणि गैरवर्तनचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे असे चित्र मागील दिड वर्षापासून लातूर शहरात दिसत आहे. दांडापोटी वसुल केलेल्या रकमेतून वेवस्था केली असती पण महानगरपालिका प्रशासनाने असे केले नाही उलट वसुली चालूच ठेवली. या टोईंग बद्दल मागील काळात अनेक वाद झाले खुद्द मनपा सदस्य अजित पाटील आणि रागिणी यादव यांचे टोईंग कर्मचाऱ्यां सोबत झालेले वाद सर्वांनाच माहीत आहेत. दिड वर्षांपासून ही अन्याय कारक वसुली थांबून सर्व वेवस्था करूनच वसुली करावी अशी मागणी अजित पाटील कव्हेकर अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा लातूर शहराच्या वतीने माननीय आयुक्त अमन मित्तल यांना निवेदन दिले याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा लातूरचे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर आणि सर्व पदाधिकारी व सदस्य नागरिक उपस्थित होते.
