महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात करोणाचा संसर्गाने पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत खूप नुकसान झाले. सुरुवातीच्या काळात कोरोणाचे प्रमाण 15% वर पोहोचला होता. परंतु लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, यांच्याकडून जिल्ह्यातील कोरोणाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी मोठी मदत झाली . या सर्वांच्या प्रयत्नातून लातूर जिल्ह्यामध्ये कोरोणाचा संसर्ग होण्याचे प्रमाण आता 0.93% वर आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी रविवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दिली आणि मनःपूर्वक आभार मानले .
जिल्ह्यातील कोरोणाची आकडेवारी
लातूर जिल्ह्यात कोरोणाचा संसर्ग ऑगस्ट- 2020 मध्ये 38 हजार 913 होती. त्यानंतर त्याचे प्रमाण मे 2020 मध्ये 16706 वर आला, तर त्यानंतर कोरोनाचा लातूर जिल्ह्यातील आलेख उतरता राहिला. यात जून 2021 मध्ये 1541 जुलै 2021मध्ये 767 ऑगस्ट 2021 मध्ये 598 सप्टेंबर आज तारखेपर्यंत 303 असा आलेख राहिला आहे. यात विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय रुग्णालयात शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत 949 RT PCR च्या टेस्ट करण्यात आल्या. यात केवळ 2 करोणा पॉजिटीव्ह रुग्ण आढळले. तर उदगीर येथील रुग्णालयात एकही करोणा पॉजिटीव्ह रुग्ण सापडला नाही. तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये 1066 मधून 14 करोणा पॉजिटीव्ह आढळले. विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयातून 2 हजार 59 टेस्ट पैकी 19 एकूण करोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले. यात अमदपुर, औसा, देवणी, जळकोट, रेनापुर, शिरूर आनंतपाळ या तालुक्यात एकही कोरोणा पॉजिटीव्ह रुग्ण आढळला नाही. केवळ चाकूर 1 निलंगा 1 लातूर उदगीर 2 लातूर शहर महानगरपालिका 9 आणि लातूर जिल्ह्याबाहेरील 3 असे 19 कोरोणा पॉजिटीव्ह रुग्ण आज रोजी आहेत. आणि मनःपूर्वक आभार मानले .