प्रेमभंगातून तरूणाची पुण्यात आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र खाकी ( पुणे ) – तरुणीने प्रेमास नकार मिळाला आणि तिच्या नातेवाईकांनी शारीरीक आणि मानसिक त्रास दिल्याने पंकज श्रीकृष्ण उबाळे वय २०, रा. वाघाळा, पो नागापुरता, परळी वैजनाथ, जि. बीड याने पुण्यातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकनाथ सावंत, सत्यजीत सावंत, उद्धव सावंत, अनिरुद्ध सावंत सर्व राहणार हेळंब, जि. लातूर यांच्यासह एका तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उबाळे याचे 2019 पासून एका तरुणीवर प्रेम होते. याची माहिती तिच्या नातेवाईकांना माहिती झाल्यावर त्यांनी पंकज उबाळे याला मारहाण केली. घरांच्या विरोधामुळे या तरुणीने पंकज याच्याशी संबंध तोडून टाकले. त्यामुळे प्रेमभंग झाल्याने पंकज हा पुण्यातील मारुंजी येथील ओयो फ्लॅगशीप हॉटेलमध्ये 28 ऑगस्ट रोजी आला. तेथे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पंकज याने आपल्या मामाला व्हाट्सअँप मेसेज केला. त्यात आपल्या प्रेयसीने आपल्यासोबत प्रेमभंग केला असून तिच्या नातेवाईकांनी शारीरीक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. गाढवे तपास करीत आहेत.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे