महाराष्ट्र

ठाणे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ल्यानंतर राज ठाकरे यांची कडक भूमिका

महाराष्ट्र खाकी (ठाणे) – ठाणे मधील कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सांयकाळी 6.30 च्या सुमारास फेरीवाल्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आहेत. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या अंगरक्षकावर देखील हल्ला झाला त्यांचे देखील एक बोट कापले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या प्रकरणी हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेत हल्ला करणाऱ्या अमरजीत यादव याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे म्हणालेकी ज्या वेळेस हा आरोपी पोलिसातून सुटेल त्यावेळेस आमच्यकडून मार खाणार! अशा लोकांचे बोट छाटली तर ते कसे गाडा चालवतात बघू ! अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

Most Popular

To Top