महाराष्ट्र

लातूर भाजपा मधील गटबाजी, मॅनेज ला बाहुबली, कट्टपा चा रंग!, फायदा मात्र काँग्रेसला

महाराष्ट्र खाकी (लातूर) – मागील काही दिवसापासून लातूरच्या राजकारणात बाहुबली चित्रपटातील पात्रांचे नाव घेऊन आरोप प्रतिरोप होत आहेत. काही दिवसापूर्वी लातूर शहरात माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काही तरुणांचा भाजप युवा मोर्चामध्ये प्रवेश झाला. या मेळाव्यात माजी शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा बाहुबली झाला, पराभव घडवून आणणारा कटप्पा शोधून काढा असे विधान केले होते.त्यावर संभाजी पाटील निलंगेकर यांनी तोच धागा पकडत बाहुबली तुम्ही नाही तर मी होतो आणि कटप्पा कोण होत हे लातूरकरांना माहीत आहे अस म्हणाले होते . मग लातूर काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी यांनी एक पोस्ट करत म्हणाले होते की “कट्टपा म्हणतोय मीच बाहुबली, बाबूजी धीरे चालना ” याचा अर्थ काय ते समजून गेला . मग वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या.
काँग्रेसचे नेते अभय साळुंके यांनी तर संभाजी पाटील निलंगेकर यांची दुटप्पी भूमिका असल्याचे सांगत कोरोनाच्या दोन्ही लाटेत तुम्ही बिळात बसला होतात असा आरोप केला आहे. अभय साळुंके पुढे बोलताना म्हणालेकी टक्केवारी करणाऱ्यानी असे आरोप करणे बरोबर दिसत नाही !
पण यातून एक गोष्ट दिसून येते की लातूर भाजपाला मॉनेज होण्याचे आरोप लागला आहे आणि आता लातूर भाजपात गटबाजी दिसून येत आहे. गडकरी गट आणि फडणवीस गट या दोन्ही गटबाजीमुळे लातूर भाजपातील वाद जनतेसमोर येत आहे. पण यातून लातूर भाजपाच्या मोठ्या नेत्यांचे नुकसान काहीच होत नाही. नुकसान तर सामान्य पदाधिकाऱ्यांचे नुकसान होत आहे. आणि याचा सर्व फायदा काँग्रेसला होताना दिसून येत आहे.याचे उदाहरण म्हणजे लातूर शहर महानगरपालिका कॉग्रेसच्या ताब्यात गेली.

Most Popular

To Top