लातुरात भर दिवसा एकावर चाकू, कत्तीने वार करून खून केला

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मागील काही दिवसापूर्वी दोन खुनाच्या घटना घडल्या होत्या या घटना शांत होत नाहीत तोपर्यंत लातूर शहरात आणखीन एक खुनाची घटना घडली आहे.लातूर शहरातील जुना औसा रोड वरील सदगुरूनगरमधील राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर गोकूळ मंत्री वय 35 वर्षीय तरूणाचा दोन अज्ञात तरुणांनी भर दिवसाढवळ्या कोयता (कत्ती) आणि चाकूने सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना आज दि.10/08/2021 मंगळवार दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली आहे. गोकूळ मंत्री असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे. खून झालेला गोकुळ मंत्री हा दादोजी कोंडदेव नगरचा राहणारा आहे. काही कामासाठी आपल्या MH 24 BA 4339 या नंबर स्पेलंडर दुचाकी गाडीवरून जात होता. त्यासोबत दोन 20 -22 वर्षीय दोन तरूण त्याच्या गाडीवर बसून जात होते. त्याच तरूणांनी सदगुरू नगरात आल्यानंतर राधाकृष्ण मंदिराच्या मागील रस्त्यावर गोकूळ मंत्री याच्या पाठीत,डोक्यात कत्ती व चाकूने सपासप वार करून खून केला आणि मारेकरी तरुण तेथून पळून गेले. . या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मयत गोकुळ मंत्रीचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले . या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Recent Posts