महाराष्ट्र खाकी (मुबंई) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांनी आमदार ते मुख्यमंत्री या कारकिर्दीत विधिमंडळात केलेल्या भाषणांचा दिलखुलास’ या पुस्तकाची तयारी सुरू आहे. याचे संपादक आहेत विलासरावांचे निकटवर्ती मित्र उल्हासदादा पवार. त्यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बद्दल शरद पवारांच्या बाबतीत एक किस्सा उल्हासदादा पवार काही दिवसापूर्वी विधान भवनात भारावून सांगत होते, ‘प्रस्तावना मागायला मी पवार साहेबांकडे गेलो. साहेब म्हणाले, प्रस्तावना देतो; पण आधी ग्रंथाची पानं नजरेखालून घालू द्या. उल्हासदादा म्हणाले, सातशे पानं आहेत. पवार साहेब म्हणाले, चालेल तरी आणा. पवार साहेबांनी ती सगळी पानं चाळली अन् मगच प्रस्तावना दिली. या पानांवर नजरही न टाकता पवार हे विलासरावांबद्दल भरभरून लिहू शकले असते; पण त्यांनी तसे केले नाही. पवार हे पवार का आहेत, त्याचं हे एक उदाहरण’.महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण नाव असणारे शरद पवार साहित्य, संगीत, कला या क्षेत्रामध्ये सातत्यानं सक्रिय असतात.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये विलासराव देशमुख यांचे राजकीय प्रस्थ हे फार मोठे होते. एका गावच्या सरपंच ते राज्याचा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास आहे हा प्रवास करत असताना त्यांनी, आपली राज्यातील सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची इच्छा कित्येकदा जाहीररीत्या बोलावून दाखवली. इतकेच नव्हे तर आपले ध्येय न लपवता त्यांनी मुख्यमंत्री पदावर ती मजल ही मारली. विलासराव देशमुख यांनी राजकारणात आणि खाजगी जीवनात मित्र खूप कमावले. महाराष्ट्रातील या बलशाली नेत्यावर महाराष्ट्रातील व देशातील महत्वपूर्ण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे शरद पवार प्रस्तावना लिहीत असतानाचा हा किस्सा चांगलाच चर्चेत आहे.