पोलीस

कात्तीने वार करून फरार असलेला आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी एक महिन्याने पकडे

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांच्या हातात आल्यापासून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात शांतता आहे गुन्हेगारीत कमालीची कमी आली आहे असे नागरिक म्हणत आहेत. सुनीलकुमार पुजारी यांच्या शांत आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे हे शक्य झाले आहे. पुजारी यांच्या कार्यकुशलतेमुळे महिन्याभरपूर्वी खणी भागातील एका नागरिकावर कत्तीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अक्षय जाधव (कोद्रे)ला अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये कलम 307 भादंविप्रमाणे पाच जनाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळीत पाचजणांचा समावेश होता. यातील तिघांना शिवाजी नगर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती तर अन्य दोघेजण फरार होते. या टोळीचा म्होरक्या असलेल्या अक्षय जाधव (कोद्रे) याला शिवाजीनगर ठाण्याच्या पथकाने अटक केली. याचा पाचवा साथीदार खंडू नामक आरोपी हा अद्यापही पोलिसांना चकवा देत फरार आहे, त्याच्या मागावर पोलीस पथक आहे. या टोळीतील पाचजणांविरोधात संबंधित पोलीस स्टेशन मध्ये कलम 307, 143, 147, 149 भादंविप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जात होता, असे शिवाजीनगर स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी म्हणाले. अक्षय जाधव (कोद्रे)ला लातुरातून पोलिसांनी अटक केली आहे. लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Most Popular

To Top