महाराष्ट्र खाकी ( उस्मानाबाद ) – उस्मानाबाद जिल्ह्यातील ताकमोडवाडी तालुका परंडा येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू विक्रेत्यास व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. महिना 1 लाख 10 हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती पण तडजोड करून महीन्याला 90 हजार रुपये ठरविण्यात आले होते. उपविभागीय कार्यालय भूम येथे प्रतिनियुक्त असलेल्या कोतवालाकर तर्फे ही रक्कम स्वीकारताना उपविभागीय अधीकारी मनीषा राशिनकर यांना पकडले आहे. 27 जुलै मंगळवारी ही कारवाई करण्यात आली, तक्रारदार वाळूची वाहतूक करतो,वाळु वाहतुक सुरक्षित चाळू देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांनी कोतवाल विलास जानकर यांच्या कर्वे तक्रारदाराकडे एक 1 लाख 10 हजाराची लाच मागितली होती त्यात तडजोड करुन 90 हजार रुपये ठरवण्यात आले, त्यातील पहिला हप्ता 20 हजार रुपये देताना तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यापूर्वी लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला होता. उपाध्यक्ष प्रशांत संपते यांनी या तक्रारीची खात्री केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या सूचनेनुसार 27 जुलै, मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भूम शहरातील अहमदनगर रोडवरील IDBI बँकेच्या जवळ असलेल्या चहाच्या हॉटेल जवळ सापळा रचला होता, पहिला हप्ता, २० हजार रुपये कोतवाल विलास जानकरला लाचेचा रकमेसह ताब्यात घेतले. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह,कोतवाल विलास जानकर यांच्या विरुद्ध भूम पोलीस ठाण्यात 28 जुलै बुधवार रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत भुम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाईत ACB अधिकारी प्रज्ञांत संपते, पोलीस उपअधीक्षक ACB विभाग उस्मानाबाद यांचा समावेश होता. या कारवाईसाठी डॉ. राहुल खाडे पोलीस अधीक्षक, ACB विभाग औरंगाबाद, ब्रह्मदेव गावडे अप्पर पोलीस अधीक्षक, ACB विभाग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनात पार पडली
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम च्या उपजिल्हाधीकारी मनीषा राशीनकर यांना ACB ने केली अटक
- Maharashtra Khaki
- July 28, 2021
- 12:28 pm
Recent Posts
पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी महायुतीला साथ देत पुन्हा एकदा राज्याची सत्ता हाती द्या – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
November 6, 2024
No Comments
विकासाचे शिलेदार होण्यासाठी सर्व बुथप्रमुखांनी आगामी 25 दिवसांचा कालावधी पक्षासाठी द्यावा – आ.संभाजी पाटील निलंगेकर
October 26, 2024
No Comments
अहमदपूर मातरदारसंघातील अपक्ष उमेदवार माधव जाधव यांची प्रचारात आघाडी
October 25, 2024
No Comments