महाराष्ट्र खाकी (लातूर) – पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सूचनेवरून जिल्हात पोलिसांची उत्तम कामगिरी चालू आहे. आणि विशेषतः लातूर शहरात DYSP राजेंद्र जगदाळे यांच्या सूचनेनुसार कायदा सुवेवस्था उत्तम आहे. शहरात कोरोनाचे नियम सर्वजण पाळत आहेत. सर्व हॉटेल, बार चालक 4 नंतर बंद करून रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल सुविधा देत आहेत. पण MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील बार्शी रोड वरील हॉटेल मयुरा गार्डन बार मात्र या नियमांना तिलांजली देत MIDC पोलिसांना, बिट अंमलदारणा आणि DB पथकला नजुमानता बिनधास्त सरकारने घालून दिलेले कोरोनाचे नियम धाब्यावर बसून आपल्याच गुर्मीत बार रात्री 8 नंतर बारचा दरवाजा लावून, बाहेरच्या लाईट बंद करून आत मध्ये बिनधास्त चालू ठेवत आहे.
आणि लोक ही जात आहेत कारण बार मॅनेजर लोकांना सांगत आहे की आमच्या मालकाने सर्व सेटिंग लावली आहे आमच्या बारवर मनपा,पोलीस कोणीच कारवाई करू शकत नाही, पोलीस बार मध्ये पाऊल सुद्धा टाकत नाही ! असे सांगून बार रात्री उशिरा पर्यंत चालू ठेवत आहे. पण यात प्रश्न असा निर्माण होतो की MIDC पोलिसांना, बिट अंमलदार, DB पथकला काहीच कसे माहित नाही ? शहरातील इतर बार मात्र रात्री 8 वाजता नियमानुसार बंद करतात आणि मयुरा गार्डन बार का नियम पळत नाही ? का या बारला MIDC पोलिसांनी विशेष परवानगी दिली आहे का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत . या सर्व प्रकारवरून एकमात्र होत आहे की असे बार शहरात किती आहेत ?