आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत लातूरचे माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

महाराष्ट्र खाकी (लातूर) – सध्या जगात कोरोनाचा प्रभाव असताना सर्व नागरिक आपली शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेवगवेगळे प्रयोग, मेडिसिन च्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. पण एक असा उपाय आहे जोकी साधा सोपा आहे संपूर्ण जगाला देण दिली आहे भारताने ति म्हणजे योगा, योगा केल्याने प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर फिट रहाते. भारत सरकार आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार करत आहे. आयुष मंत्रालय भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार प्रोफेसर डॉ.सुनील बळीराम गायकवाड हे प्रथम श्रेणीत (distinction) मधे उत्तीर्ण झाले आहेत. ते भारतातील पहिले माजी खासदार ठरले आहेत ज्यांनी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची योगशिक्षक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना पतंजली युवा जिल्हाध्यक्ष अमर वाघमारे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल डॉ सुनील गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ सुनील बळीराम गायकवाड हे अनेक विषयात उच्च पदवी घेतलेले आणि व्यवस्थापन शास्त्र मध्ये डॉक्टरेट घेतलले असून त्यांनी आयुष मंत्रालय नी घेतलेल्या आंतरराष्ट्रीय योगशिक्षक परीक्षेत उच्च श्रेणी चे मार्क्स घेऊन पास झाले आहेत. मित्र परिवारा कडून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

Recent Posts