महाराष्ट्र खाकी (औरंगाबाद) – महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यापासून औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आणि राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असेल पत्रकार परिषदेत सांगितले.आता बऱ्याच तरुणांचे पोलिस होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असे दिसतय.पोलिस भरती कशा प्रकारे होणार हेही गृहमंत्र्यानी सांगितल राज्य पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार असून डिसेंबर 2021 पूर्वी यापैकी 5 हजार 200 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
त्यानंतर उर्वरित 7 हजार पदे भरली जाणार आहेत
औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक पार पडली या बैठकीत कायदा सुव्यवस्था परिस्थिती, गुन्हे दाखल आणि सिद्ध होण्याचे प्रमाण तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांबाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. पोलीस दलाने सर्वसामान्यांना सहकार्य व सौजन्यपूर्ण वर्तणुकीतून आदरपूर्ण सेवा द्यावी, यातून पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल, महिलांसंदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांची तात्काळ दखल घेऊन नोंद आणि तपास करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या. औरंगाबाद परिक्षेत्राची हद्द वाढविण्यासंदर्भात ऑरिक सिटी व वाळूज औद्योगिक क्षेत्राचा समावेडा करण्याबाबतचा प्रस्ताव तयार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.