महाराष्ट्र खाकी (मुंबई) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाळत ठेवली जात असल्याचं बोलण्यात येत आहे. तसेच या मुळे राजकीय क्षेत्रात अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत . त्याच पार्श्वभूमीवर सध्या नाना पटोले यांच्याकडून या प्रकरणात सारवासारव करण्यात येत आहे. नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मी बोललो हे खरं आहे.पण मी राज्य सरकारला नाही, तर केंद्र सरकारला उद्देशून म्हटलं होतं. तसेच माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका न्यूज tv च्या प्रतिनिधीशी बोलत असताना त्यांनी मुंबईत आल्यावर याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देईल असं म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पाया खालची जमीन सरकताना दिसून येत असल्याचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना उद्देशून म्हटलं होतं. या सर्व प्रकरणात महाविकास आघाडी सरकारकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येणार? हे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संपूर्ण प्रकरणात महा विकास आघाडीमध्ये सर्व काही वेवस्तीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण
- Maharashtra Khaki
- July 12, 2021
- 12:56 pm
Recent Posts
लातुरात विसर्जन मिरवणुकीवर लातूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त दोन हजार पोलिसांसह सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन ची नजर
September 16, 2024
No Comments
LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करून LCB ची धडाकेबाज कारवाई
September 15, 2024
No Comments