लाईफ लाईन हॉस्पिटल सिल करण्याचे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांचे आदेश

महाराष्ट्र खाकी (बुलढाणा) – सध्या कोरोनाने सर्व जण परेशान आहेत. यात सर्व आरोग्य प्रशासन जीव लावून आपले कर्तव्य बाजावत आहेत. पण काही लोक असे आहेत की त्यांनी या कोरोनाच्या कठीण काळात पैसे कमवायच्या नादात माणुसकी विसरून गेले आहेत. अशीच एक घटनाखामगाव येथील लाईफ लाईन हॉस्पिटलने कोविड-19 रूग्ण तपासणीसाठी शासकीय परवानगी घेतलेली नव्हती, तरीही रूग्णालयात कोविड रूग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना या हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी समिती स्थापन करुन हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. या अहवालात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या असून यामध्ये सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एका कोव्हिडच्या रुग्णाला 14 रेमडीसीव्हीर इंजेक्शन दिल्याचे समोर आले आहे. यावरून दि 28/06/2021सोमवारी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी सदर हॉस्पिटल सील करण्यात यावे आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

Recent Posts