महाराष्ट्र खाकी( दिल्ली ) – लोकसभेत प्रश्नोतराच्या काळात महाराष्ट्रातील ४८ खासदाशंनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या नुकतीच ‘संपर्क’ या सामाजिक संस्थेने प्रसिध्द केली . या विषयी लोकसभेच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध आहे. यामध्ये लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी दोन वर्षांमध्ये 208 प्रश्न विचारले असून त्यांचा समावेश राज्यातील टॉपटेन खासदारांमध्ये झाला आहे. त्यांच्या खालोखाल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी 179 प्रश्न तर बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी 157 प्रश्न विचारले आहेत. उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 98 प्रश्न विचारले असून परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सुध्दा 95 प्रश्न विचारले आहेत.
महाराष्ट्रातील खासदारांच्या कामांचा लेखाजोखा त्यांच्या लोकसभेच्या कामकाजावरुन ‘संपर्क’ या संस्थेने जाहीर केला आहे महाष्ट्रातील 48 खासदारापैकी तिघेजण मंत्री
आहेत. यामध्ये नितीन गडकरी, रावसाहेब दानवे व संजय धोत्रे या तिघांचा समावेश आहे. हे तिघेजण सरकारमध्येच सामील असल्यामुळे प्रश्न विचारण्याची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. खासदार पुनम महाजन यांची माहितीच लोकसभेच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. अशावेळी 44 खासदारांच्या कामांचा जो लेखाजोखा ‘संपर्क’ने प्रकाशित केला आहे. त्यामध्ये नांदेडच्या खासदारांचा तब्बल 39 वा क्रमांक लागतो. सर्वाधिक प्रन विचारणाऱ्यांमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (313), धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भागरे व शिस्रचे खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रत्येकी (306), मावळचे खासदार श्रीरंग बारणे (298), उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर (290), कोल्हापूरचे खासदार
संजय मंडलिक (271), रायगडचे खासदार सुनिल तटकरे (252), नंदूरबारच्या खासदार डॉ. हिना गावित (240), रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत (213) व लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे (208) यांचा समावेश आहे. केंद्रातील प्रत्येक योजना जिल्ह्यासाठी आणि लोकांपर्यंत किती प्रभावीपणे आणल्या ते मात्र दिसून येत नही अशी चर्चा जिल्ह्यात चालू आहे.