लातूर जिल्ह्यात आणि शहरात गांज्या आणि वेगवेगळ्या कंपन्याच्या बनावट दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनचे नियम काही प्रमाणात शिथिल करून सर्व आस्थापनाना चालू करण्याची परवानगी दिली आहे. पण मागील लॉकडाऊन मधील काळात लातूर जिल्ह्यात आणि शहरात गांजा आणि बनावट दारू विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लातूर शहरात तर बनावट दारू बनवणे आणि विक्री करण्याच्या प्रमाणात खूप मोठी वाढ झाली आहे. शहरातील काही प्रिंटिंग प्रेस (ऑफसेट) वाले बनावट दारुसाठी वेगवेगळ्या दारूच्या कंपन्याचे स्टिकर (लेबल) बिनधास्त छापून देत आहेत अशी चर्चा लोक करत आहेत !जिल्ह्यात हात भट्टी अड्डयावर LCB आणि पोलिसांनी धाडी टाकून कारवाई केली आहे. लोकांनी पोलिसांचे कौतुक ही केले पण बनावट दारू आणि गांज्या विक्री जोरात चालू आहे.

गांज्या तर जिल्ह्यात गल्ली बोळात पिला जातो असे चित्र दिसत आहे! लॉकडाऊन मधील सर्वात स्वस्त नशा म्हणून वरिष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी या कडे आकर्षित होत आहेत. नांदेड रोड वर असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या मागे गांज्या खुले आम विकला आणि पिला जातो ही बाब लोकांना माहिती होते आणि पोलिसांना माहित होत नाही हे दुर्दैयव म्हणावे लागेल. लातूरच्या रिंग रोड लागत, रिकाम्या जागेत लोक, तरुण मंडळी बिनधास्त तासन – तास बसून गांज्या पीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे सर्व थांबवायच असेल तर गांज्या विक्रेत्यांना पोलिसी हिसका दाखवावा लागेल तरच हे सर्व थांबेल. हिच परिस्थिती बनावट दारू बद्दल ही आहे. वेगवेगळ्या कंपन्याची बनावट दारू पकडणे आणि प्रतिबंध घालणे राज्य उत्पादन कार्यालयचे काम आहे.

त्यांनी कार्यवाही केली नाही म्हणून पोलिसांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. बनावट दारू बनवणाऱ्यांना पकडायचे असेल तर पोलीस आणि राज्यउत्पादन विभागाला खूप मेहनत ग्यावी लागेल असे वाटत आहे! आता पुढील काळात या सर्व गोष्टी लातूर जिल्ह्यात आणि शहरात दिसणार किंवा घडणार नाही ही काळजी पोलीस घेतील अशी अपेक्षा लोक करत आहेत.
तसेच लातूर शहरात काही लॉज वर वेश्या व्यवसाय जोरात सुरु आहे. कोरोनाच्या काळात ही हा धंदा बिधास्त काही लॉज वाले करत आहेत रात्री 11 – 12 वाजेपर्यंत हे काम चालूच असते. काही लॉज तर भर मार्केट मध्ये आहेत. आणि यातील काही लॉजवर तर पोलिसांनी आधीपण कारवाई केली आहे. तरीही हे लॉजवाले हे काम बिनधास्त आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी नवीन पद्धतीने करत आहेत ही बाब विशेष. लवकरच पोलीस या सर्व गोष्टींवर कारवाई करून हे सर्व थांबवतील.

Recent Posts