महाराष्ट्र

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेडला SBI बँकेचे विभागीय कार्यालय मंजूर करून घेतले

महाराष्ट्र खाकी (नांदेड ) – नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी चव्हाण परिवाराने मोलाचे कार्य केले आहे. आणि करत आहेत. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विभागीय महसूल कार्यालय मंजूर करून घेतले आणि आता देशातील अग्रगण्य स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय कार्यालय नांदेड येथे मंजूर झाले आहे. येत्या दि. 1 जूनपासून SBI चे विभागीय कार्यालय सुरु होणार आहे. नांदेड येथे विभागीय कार्यालय मंजूर करून घेण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) ही राष्ट्रीय बँक आहे. ही देशातील सर्वाधिक वेस्त असलेली बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही SBI बँक आघाडीवरील बँक आहे. देशाचे अर्थमंत्री असताना डॉ. शंकरराव चव्हाण यांनी 1988 मध्ये नांदेड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय मंजूर करून घेतले होते. त्यानंतर आता त्यांचेच पुत्र व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे विभागीय कार्याल आणले आहे, हे उल्लेखनीय SBI चे विभागीय कार्यालय नांदेडला आल्याने आता दोन कोटींहून अधिक कर्जाच्या मंजुरीचे निर्णय नांदेडमध्येच घेतले जाणार आहेत. प्रशासकीय दृष्ठिकोनातून देखील ही बाब उपयुक्त ठरणार आहे. बँकेचे वाढलेले कार्य व ग्राहक सेवेचा विचार करता नांदेड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी पालकमंत्रे अशोकराव चव्हाण यांनी बँक व्यवस्थापनाकडे केली होती. ही महत्त्वपूर्ण मागणी करून ती पूर्ण केल्याबद्दल बँकेचे ग्राहक व बँक अधिकारी, कर्मचार्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

Most Popular

To Top