महाराष्ट्र

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील जम्बो कोविड सेंटरच्या कामाचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला

महाराष्ट्र खाकी (आंबेगाव) – महाराष्ट्रातील सर्वात मोठे ग्रामीण कोविड केअर सेंटर आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे निर्मितीचे काम जोरात सुरु आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वाळसे पाटील यांच्या मार्गदर्शनात होत आहे. या कोविड केअर सेंटरच्या ऑक्सिजन, आयसीयू बेडची सुविधा असलेले जम्बो कोविड सेंटरच्या कामाच्या प्रगतीचा आढावा आज बैठकीत घेतला. अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. या बैठकीला आ. अतुल बेनके, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. सीईओ आयुष प्रसाद, पुणे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.

Most Popular

To Top