कृषि विभागातील कर्मचारी अधिकारी, कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी यांना फरन्टलाईन वर्कर म्हणून घोषीत करा – आमदार अभिमन्यू पवार

महाराष्ट्र खाकी (औसा) – औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत की ते आपल्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी सर्वात जास्त वेळ देत आहेत. कोरोनाच्या काळातही लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत त्यानी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन उपाय योजना केल्या सोबत लोकांचे उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आता त्यानी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना निवेदन देऊन कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना फरन्टलाईन वर्कर म्हणून घोषीत करा.शासनाच्या दि. 29 मे 2020 नुसार फ़रन्टलाईन वर्कर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यास 50 लाखाचे विमा कवच राज्य शासनाने लागू केलेले आहे. वरील नियमानुसार कृषि विभागातील कर्मचारी अधिकारी, कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी आदी. कर्मचारी यांनी लॉकडाऊन काळात शेती माल भाजी पाला, फळे धन्य शेतमाल खरेदी


विक्रीची व्यवस्था उभारणे, पोकरा योजना विहीत मुदतीत राबविणे, विस्तार योजनेतील कामांची अमलबजावणी करणे, शेतकरी बैठका घेणे, बिज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी, म.ग्रा.रो. ह. यो. फळबाग लागवड, विकेल ते पिकेल तसेच राज्य व केंद्र शासनाने दिलेली वेगवेगळी उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांशी वारंवार संपर्क येतो. त्याप्रमाणे शासनाने वेळोवेळी हंगामपूर्व नियोजना करिता क्षेत्रीय स्तरावर जावून शेतकऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. अधिक माहिती घेतली असता महाराष्ट्र राज्यातील कृषि विभागातील सुमारे 2500 कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत. त्यापैकी सुमारे 70 ते 75 अधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे मृत्यू पावले आहेत. आणि त्यांचे लसीकरण न झाल्यामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. कुंटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अकाली निधन झाल्यामुळे परिवारावर आर्थिक व मानसिक आघात होत आहे, म्हणून फरन्टलाईन वर्कर घोषीत करून 50 लाखाचे विमा कवच राज्य शासनाने मंजूर करावे. अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Recent Posts