महाराष्ट्र खाकी (लातूर) -महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या 76 व्या जयंतीचे औचित्य साधून आज लातूर येथे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कोविड19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटचे भूमिपूजन लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. यावेळी माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब ,लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हा अध्यक्ष उटगे व इतर पदाधिकाऱ्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या कारखाना परिसरातील स्मृतीस्थळी अभिवादन केले.
लातूर महानगरपालिकेत विलास वृक्ष लावले
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त लातूर महानगरपालिकेत जयंती कोरोनाचे सर्व नियम पळत साजरी करण्यात आली यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल, महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, शहर जिल्हा अध्यक्ष किरण पाटील ई उपस्थिती होते. यावेळी मनपा आवरत विलास वृक्ष म्हणून वृक्षा रोपण केले.
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे विशेष अभिवादन.
तो एक राजहंस.
मराठावाड्यातील लातूरच्या बाभळगाव सारख्या ग्रामीण भागातून आपल्या कर्तृत्वावर सरपंच ते मुख्यमंत्री व पुढे केंद्रीय मंत्री पदा पर्यंतचा थक्क करणारा प्रवास म्हणजे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब. महाराष्ट्राला स्वच्छ राजकारणी, विकासाप्रती आक्रमक बाणा व कृतीशील नेतृत्व असलेले विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री म्हणून लाभले आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून साहेबांनी इतिहास घडविला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन वेळा यशस्वी मुख्यमंत्री म्हणून साहेबांनी केलेल्या कामाची नोंद आहे. याच कामाची व नेतृत्वाची पावती म्हणून साहेब पुढे दिल्लीत गेले आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री झाले. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या दिल्लीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. माणूस कितीही मोठा झाला तरी त्यांची आपल्या जमीनीची नाळ कायम असली पाहिजे हे साहेबांनी दाखवून दिलं. देशमुख साहेबांनी देशाच्या राजकारणात सर्वोच्च पातळी गाठली तरी कधी आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. साहेब नेहमी म्हणायचे ‘जे जे नवं ते ते माझ्या लातूरला आणि मराठावाड्याला हवं’ याच शब्दावर ठाम राहून त्यांनी लातूरला विकासाच्या दृष्टीने सक्षम केलं. मराठवाड्याच, लातूरचं भूषण, उत्कृष्ट भाषणशैली, हजरजबाबी, संयमी, कृतीशील नेता, स्वच्छ राजकारणी, विकासरत्न, लातूररत्न,महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
विनम्र अभिवादन