महाराष्ट्र

विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त “आमचा खरा देव चोरला देवाने”


महाराष्ट्र खाकी (लातूर) – साहेब तुमच्या मुळे आज प्रत्येक लातूरकर अभिमानाने जगत आहे तुमचे योगदान आमच्या साठी अमूल्य असे आहे तुमच्या मुळे आज हिथला शेतकरी चांगल्या प्रमाणावर पीक घेऊन मोठी उंची गाठत आहे, तुमचे प्रेम जनते वर नेहमी राहिले आणि त्या साठी तुम्ही नेहमी अग्रेसर होते साहेब तुम्ही एक आमच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहोत तुमच्या असण्याने हिथला प्रत्येक माणूस बिनघोर असायचा त्यांना वाटायचं आमचे साहेब आहेत ते कधी लातूर कडे पाठ फिरवणार नाहीत असा नेहमी दृढ विश्वास होता आमच्या मायबापाचा आणि हिथल्या प्रत्येक माणसाचा साहेब तुमचे शब्द ऐकुन एक प्रेरणा यायची तुमचे भाषण आमच्या साठी एक वेगळीच उमेद घेऊन यायचे जेव्हा तुमची अजुन मी भाषणे ऐकतो तेव्हा नेहमी असं वाटतं तुम्ही नेहमी आमच्या सोबत आहोत तुमच्या भाषणाने अंगात चैतन्य पेटुन उठतं आणि आपल्या हकाच्या काँग्रेस विचार धारेशी जोडुन राहण्या साठी प्रोत्साहित करून जातं, वेळ वाईट होती तरी तुम्ही कधी डगमगले नाही नेहमी स्वाभिमानाने ताठ मानेने उभे राहिले तुमच्या त्या भाषणाचे ते शब्ध मी कधीच विसरू शकत नाही. “काँग्रेस हा एक पक्ष नसुन ती एक विचार धारा आहे आणि ती नेहमी गोर गरीबांच्या सोबत असणार आहे ती सामान्य लोकांच्या नेहमी हितासाठी आहे”…


आणि खरचं साहेब त्या तुमच्या बोलण्याने प्रोत्साहित होऊन मी काँग्रेस पक्षाशी जोडुन गेलो आणि मला त्याची पावती पण भेटली मी आजा आख्या “महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सोशल मीडिया चा प्रदेश सचिव” आहे हे शक्य नाही पण माझ्या कामाची पावती समजा, एका सामान्य आणि अत्यंत गरीब घरातला मी माझा बाप खुप हलाखीच्या परिस्थितीत असला तरी शेवट पर्यंत तुमच्या कीर्तीचे गोडवे आम्हाला सांगत राहिला, साहेब तुम्ही आज असायला हवे होते तुमच्या असण्याने आज गोरगरीब दोन वेळेच्या जेवणासाठी मुकले नसते आणि तुमचे निर्णय नेहमी ठोस आणि लोकांच्या हितासाठी असल्याने ह्या प्रसंगी तुमची खुप गरज भासते साहेब,
साहेब तुमची जयंती आहे ह्या जयंती ला मी तुमच्या दर्शनासाठी पण येऊ शकत नाही कारण की वेळ खुपचं जास्त वाईट आहे…विनम्र अभिवादन साहेब.

आमचा खरा देव चोरला देवाने

हा लेख महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सोशल मीडिया चा प्रदेश सचिव यांनी लिहिला आहे.

Most Popular

To Top