महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण महाराष्ट्र आरोग्य वेवस्थापनावर खूप मोठी जबाबदारी होती. आणि हि जबाबदारी प्रत्येकाने जीवाची बाजी लावून पूर्ण केली. पण यात आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. लातूर महानगरपालिकेला हि या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनात आणि नियोजनात मानपा उत्तम कार्य करत आहे. मनपा आणि महापौर यांच्या कार्यालय काही अडचण येऊनये म्हणून अनेक लोकांनी आर्थिक, आरोग्य उपकरणे देऊन मदत केली. मनपा आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या मदतीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी परिवहन मंत्री आ.दिवाकर रावते यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आपल्या स्थानिक विकास निधीतून लातूर महानगरपालिकेस रुग्णवाहिकेसाठी 17 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.या निमित्ताने परत एकदा लातूरचे खासदार यांची आठवण लातूरकरांना होईल हे मात्र नक्की आहे.
कारण खासदार यांनी लातूरकडे 3 महिने साध ढुंकून हि पहिले नव्हते !3 महिन्यानंतर खासदार आले 2-3 कोविड सेंटरला भेट देऊन लगेच परत गेले. खासदार आले त्यानी पहिले आणि त्यानी जिंकल काय ते त्यानांच माहिती अशी शहरात चर्चा सुरु आहे. लातूरचे राजकीय नेते कमी पडले म्हणून लातूरच्या बाहेरील नेते लातूर मनपाच्या मदतीसाठी धावले हे मात्र या निमित्ताने जाणवत आहे. दिवाकर रावते यांचे लातूर मनपाचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी विशेष आभार मानले आहेत. “ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मा.आ.दिवाकर रावते साहेबांनी कोरोनाच्या अनुषंगाने आपल्या स्थानिक विकास निधीतून लातूर महानगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी 17 लक्ष रुपयांचा निधी दिला. साहेब आपण कोरोनाच्या संकटात लातूरसाठी विशेष लक्ष देऊन सहकार्य केल्याबद्दल लातूरवासियांच्या वतीने मी आपले आभार मानतो “