महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातुन मोटर सायकल चोरी करणाऱ्या एकाला गांधी चौक पोलीस स्टेशन गुन्हे शाखा व उपविभागीय पोलीस विशेष पथक पोलिसांनी ताब्यात घेतले . त्यांच्याकडून 3 लाख 7 हजार किमतीच्या शाईन -1बुलेट-1 स्प्लेंडर-1अपाचे-1 अशा चार महागड्या दुचाकी घेण्यात आल्या आहेत. सोहेल पाशा सय्यद राहणार रेणापूर याला ताब्यात घेऊन व त्याचा साथीदार ज्ञानेश्वर जाधव राहणार रेणापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन कालावधीत अनेकांनी सहज झटपट पैसे मिळविण्यासाठी चोरीच्या गुन्ह्याकडे वळले. त्यावर अंकुश मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे व गांधी चौक पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गांधी चौक गुन्हे शाखा व उपविभागीय विशेष पथक पोलिसांनी वाहन चोरांची माहिती काढण्यास सुरुवात केली. वाहन चोरी झालेल्या घटनास्थळावरील परीसरातील CCTV फुटेज व घटनास्थळावरील तांत्रिक माहिती घेऊन त्यामध्ये गुन्हेगार सोहेल पाशा सय्यद राहणार रेणापूर मोटर सायकल चोरी करीत असल्याचे आढळले. सोहेल पाशा सय्यद याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे 1 बुलेट व 3 मोटरसायकल आहेत असे तपास अधिकाऱ्यांना दिसून आले या मोटर सायकल विक्रीकरीता ठेवल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले, विशेष पथकातील पोलीस हवलदार रामचंद्र ढगे ,पोलीस नाईक महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, अशोक राठोड, दत्ता शिंदे, रणवीर देशमुख, ओम बेस्के, गोविंद भोसले,चालक अजय मस्के
यांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव व सोहेल पशा सईद यानी गेल्या 8 महिण्या पासून उस्मानाबाद,नांदेड व लातूर या ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केलेल्या असून तो सध्या जेल मध्ये आहे.सह आरोपी असलेला सोहेल पाशा सय्यद दोघे राहणार रेनापुर यास ताब्यात घेऊन त्याचेकडून खंडाळी येथील शाईन -1बुलेट-1 स्प्लेंडर-1अपाचे-1 असे एकूण चार मोटर सायकल किंमत अंदाजे 3 लाख 7 हजार सोहेल पाशा सैय्यद याचे कडून हस्तगत करून घेऊन पोलीस स्टेशन किनगाव येथे रिपोर्ट सह हजर केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बंकवाड व चंदू गोखरे हे करत आहेत.