महाराष्ट्र

करवीर तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटर साहित्यात
कोणताही गैरप्रकार नाही; तालुका वैद्यकीय अधिकारी

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – करवीर तालुक्यातील बंद करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य जवळच्या आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. राजर्षि छ. शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर येथे कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य बालिंगा येथील आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे सर्व साहित्य कोव्हिड केअर सेंटरचे आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. त्यामुळे कोव्हिड केअर सेंटरवरील साहित्यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही असे स्पष्टीकरण करवीर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले आहे. करवीर तालुक्यात कोव्हिड-19 चे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने मागील वर्षी राजर्षि छ. शाहू विद्यानिकेतन, के. आय.डी. कॉलेज बॉईज होस्टेल गो. शिरगांव, भोगावती महाविद्यालय कुरुकली, डी.सी.नरके विद्यानिकेतन कुडीत्रे येथे कोव्हिड केअर सेंटर चालू करण्यात आले होते. डिसेंबर नंतर कोव्हिड-19 रुग्णांचे प्रमाण कमी आल्यानंतर टप्प्याटप्याने कोव्हिड केअर सेंटर बंद करण्यात आले संबंधित सर्व ठिकाणी विद्यार्थ्याचे वसतिगृह असल्याने कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य रिकामे करणे आवश्यक होते. बंद करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य करवीर तालुक्यातील जवळच्या प्रा.आ. केंद्र व उपकेंद्र याठिकाणी ठेवण्यात आले होते जेणेकरुन भविष्यात पुन्हा कोव्हिडची लाट आल्यास कोव्हिड सेंटर चालू करता येईल, असेही तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Most Popular

To Top