लातूर LCB आणि अन्न, औषध विभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीत रेमडीसिविरचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – राज्यात कोरोनाचा संसर्घ वाढला आहे रुग्णांची संख्या भरमसाठ असल्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि म्हणत्वाचे म्हणजे रेमडिसिवीर इंजेक्शस्न मिळत नाहीत याचा तुटवडा खूप आहे. रुग्णासाठी आवश्यक असल्यामुळे रेमडिसिवीर चोरून चढ्या भावाने विकून काही लोक काळा बाजार करत आहेत. राज्यात बऱ्याच ठिकाणी कारवाया झाल्या आहेत. अशीच एक कार्यवाही लातूर शहरात LCB आणि अन्न व औषधी विभाग यांनी संयुक्त कारवाई करून शाहू चौकाच्या पुढे आंबेडकर चौकाजवळ
1 ) अनिकेत माधव तेलंगे वय 20 राहणार जानवळ हल्ली मुक्काम नाथनगर लातूर आणि 2 ) ओमकार भगवान शेळके वय 26 राहणार आष्टा , हल्ली मुक्काम लातूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन रेमडीसीवीर इंजेक्शन्स किमती 10,200/रुपये आणि दोन मोबाईल किंमत 20,000/ रुपये चे असा एकूण 30,200/रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ,


वरील आरोपी हे रेमडीसिविर इंजेक्शन्स प्रत्येकी 25,000/ रुपये दराने गरजू व्यक्तींना विक्री करणार होते या दोघांसह अन्य एका व्यक्ती अशा एकूण तिघा व्यक्तींवर पोलिसांनी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे कलम 420,188,34 भारतीय दंड संहिता ,, कलम 3,7 जीवनावश्यक वस्तू कायदा ,, कलम 3 साथरोग नियंत्रण कायदा ,, कलम 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 कलम 18 सी 27 औषधी आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,2 रेमडीसिविर इंजेक्शन्स सह चा काळाबाजार करून जास्त किमतीमध्ये रेमडीसिवीर इंजेक्शन्स विक्री करत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी अशा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव DYSP श्री जितेंद्र जगदाळे लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसापासून रेडीमशिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या इसमांच्या मागावर पोलीस होते, LCB चे पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, संपत फड , सुधीर कोळसुरे , बालाजी जाधव , नाना भोंग, नामदेव पाटील तसेच अन्न व औषधी विभाग चे औषध निरीक्षक श्री सचिन बुगड यांनी हि कार्यवाही केली आहे.
अशा कठीण परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही औषधांची काळाबाजारी किंवा चढ्या दराने विक्री करू नये असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने करण्यात करण्यात येत आहे

Recent Posts