पोलीस

पुणे ग्रामीण पोलिस भरोसा सेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक M.S. देशमुख यांनी कोविड सेंटर मधील कोरोना बाधित महिलांना भेट दिली.

महाराष्ट्र खाकी (पुणे) – पुणे ग्रामीण पोलिस दलातील भरोसा सेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक एम. एस. देशमुख यांनी स्वतः पी.पी.ई. किट घालून कोविड केअर सेंटर मधील कोरोना बाधित महिलांना प्रतक्षात दिली भेटी. पुणे ग्रामीण हद्दीतील दौंड उपविभाग व बारामती उपविभागात 5 पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या 13 कोविड केअर सेंटरला आज दि.22/04/2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाने भरोसा सेलच्या मपोसई एम. एस. देशमुख तसेच त्यांच्या सोबत महिला अंमलदार मपोशि/ पी. एस. गुंड, चालक पोशि/ डी. पी.वीरकर यांनी स्वतः PPE किट घालून प्रतक्षात भेटी देऊन पाहणी केली व मा. निलम गोऱ्हे मॅडम यांनी कोविड केअर सेंटर मध्ये महिलांच्या सुरक्षितते बाबत दिलेल्या गाईडलाईन नुसार सूचना केल्या त्यामध्ये महिला डॉ. व कर्मचारी, महिला विलगीकरन कक्ष, महिला सुरक्षा रक्षक महिला, सफाई कर्मचारी तसेच CCTV कॅमेरा या संदर्भात पाहणी केली व जेथे निदर्शनास आले नाही त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या, आणि पोलीस मदत केंद्र दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देऊन कोणत्याही प्रकारची महिलांची तक्रार असेल तर कळवण्यास सांगितले. महिला रुग्णांची भेट घेऊन चर्चा केली, व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर दिला, तसेच महिला सुरक्षितते बाबत सदर गाईडलाईनची एक एक प्रत प्रत्येक शासकीय कोविड केअर सेंटर प्रमुखास माहितीस्तव दिली असून सर्व महिला लवकरात लवकर बऱ्या होणार अशा सदिच्छा दिल्या.

Most Popular

To Top