महाराष्ट्र खाकी ( सातारा ) – लोणंद येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लँट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरु करण्यात आला. या प्लँटचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख्य उपस्थितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, प्रातांधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार दशरथ काळे, धिरज चंद्रा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थावक प्रदिप राऊत आदि उपस्थित होते. सोना अलॉज् पोलाद निर्मितीची कंपनी असून येथील बंद असलेला ऑक्सिजन प्लँट लोक प्रितिनिधी व प्रशासनाच्या प्रयत्नातुन सुरु करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लँटमधून रोज ऑक्सिजनचे 1500 सिलेंडर भरले जातील. यामुळे जिल्ह्याची बहुतांशी ऑक्सिजनची गरज पुरविण्यास मदत होणार आहे. यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारा जिल्ह्यातील सोना अलॉज् कंपनीतील ऑक्सिजन प्लँटचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन
- Maharashtra Khaki
- April 24, 2021
- 12:41 pm
Recent Posts
पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी महायुतीला साथ देत पुन्हा एकदा राज्याची सत्ता हाती द्या – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
November 6, 2024
No Comments
विकासाचे शिलेदार होण्यासाठी सर्व बुथप्रमुखांनी आगामी 25 दिवसांचा कालावधी पक्षासाठी द्यावा – आ.संभाजी पाटील निलंगेकर
October 26, 2024
No Comments
अहमदपूर मातरदारसंघातील अपक्ष उमेदवार माधव जाधव यांची प्रचारात आघाडी
October 25, 2024
No Comments