महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालू आहे. सर्व रुग्णालये रुग्णांनी भरले आहेत. बेड मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यच्या आरोग्य यंत्रणा कमी पडतीय अशा परिस्थितीत लातूरच्या सर्व लोकप्रतिनिधीनी आपापल्या परीने काहींना काही आपल्या फंडातून आरोग्य यंत्रनेस दिले आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटलांनी 10 रुग्णवहीका दिल्या, निलंग्याचे आमदार संभाजी पाटलांनी हि काही रुग्णवहीका दिल्या, राज्यमंत्री संजय बनसोडे, धीरज देशमुख, रमेश अप्पा कराड, अभिमन्यू पवार पालकमंत्री अमित देशमुख इतकंच काय तर लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी 2 रुग्णवहीका दिल्या, माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या महाराष्ट्र नगरी सहकारी बँके तर्फेही रुग्णवहीका दिली. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या कार्याने प्रेरित होऊन मुळचे लातूरचे श्री.व्यंकटेशजी बिराजदार लातूरच्या आरोग्य सेवेसाठी कॅलिफोर्नियातून १ लाखाची मदत केली आहे. पण लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी तर कहरच केला लातुरच्या या संकट काळात लातूरकडे ढुंकूनही पहिले, लक्ष दिले नाही ही खूप वाईट गोष्ट आहे. खासदार म्हणून त्याचे लातूरच्या जनतेप्रति काहीतरी कर्तव्य असते हे बहुदा ते विसरले असतील असे दिसून येत आहे.
खर पाहता खासदारांनी या संकट काळात लातूर मध्ये थांबून जनतेची मदत केली पाहिजे. पण तस न करता खासदारांनी तर कालच्या ऑक्सिजन पुरवठा होत असलेल्या गाडीचा व्हिडीओ लातूर काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओ आणि लिखाण यांची कॉपी करून खासदारांनी पोस्ट केली आहे. मदत तर नाहीच पण ज्यांनी केली आहे त्यांच्या पोस्ट कॉपीपेस्ट करत आहेत ! ही बाब प्रवीण सूर्यवंशी यांनी जनतेसमोर दाखवली आहे. लातूरच्या भाजपाच्या नेत्या प्रेरणा होनराव यांनी काल व्हिडीओतुन पालकमंत्री यांना परिस्थितीचा आढावा देत जाब विचारला होता, तसाच जाब खासदारांना विचारणार का अशी चर्चा होत आहे. खासदारांचे हे वागणे पाहून खासदारांना लातूरची ऍलर्जी आहे का कोरोनाची ? हे जनतेला समजत नाही. विना लातूरचे खासदार का विना खासदाराचे लातूर हे लोकांना समजत नाही. लोक तर अशीही चर्चा करत आहेत की यांच्या पेक्षा आधीचे खासदार सुनील गायकवाड हेच बरे होते!