ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिंटमेंट या त्रिसुत्रानुसार अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर भर द्यावा -पालकमंत्री सतेज पाटील

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिंटमेंट या त्रिसुत्रानुसार अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर भर द्यावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज इचलकरंजी येथील आय. जी. एम. रूग्णालयाला भेट देवून आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल माळी, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, अतिरिक्त पोलिस प्रमुख जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी.बी.महामुनी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्रकुमार शेट्ये आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, आवश्यकतेनुसार कोविड काळजी केंद्र वाढवावेत, शक्यतो सभागृह घेवून सुविधा निर्माण कराव्यात. प्रातांधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टरांसोबत बैठक घेवून त्यांना जबाबदारी द्यावी. संभाव्य रूग्णसंख्या लक्षात घेवून तयारी ठेवावी आणि आवश्यक ते नियोजन करावे. कंत्राटी पध्दतीने आवश्यक ते कर्मचारी घेण्यात यावेत. मृत्यूदर रोखण्याबाबत सर्वांनीच योग्य पावले उचलावीत.


जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, मृत्यूदर कमी होण्यासाठी डॉक्टरांनी विशेष दक्षता घ्यावी. सर्व नगरसेवकांना सक्रीय करावे. प्रभाग समित्या सक्रीय करावेत. लवकर डिटेक्शन करून लवकर उपचाराला सुरूवात करावी. संशयित रूग्णांची आर.टी.पी.सी.आर.करण्याबाबत खासगी ओ.पी.डी. करणाऱ्या डॉक्टरांनी कळवावे. लसीकरणाबाबत आय.जी.एम.प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करावी. कारखानदारांनी त्यांच्या कामगारांची ॲन्टीजेन चाचणी करून घेणे त्यांची जबाबदारी आहे.
आमदार श्री. आवाडे यांनी 20 वर्षे काम केलेल्या 42 कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करण्याबाबत पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले. यानंतर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी व्यंकटेश्वरा हायस्कूल मधील कोविड काळजी केंद्राला भेट देवून तेथील पाहणी करून सूचना दिल्या.

आय.जी.एम.मधील आजची स्थिती
ऑक्सीजन बेड- 200, आयसीयू बेड-10, व्हेंटिलेटर-28,
एकूण रूग्ण संख्या-227, एनआयव्ही रूग्ण-3,
ऑक्सीजनवरील रूग्ण-77, नवीन रूग्ण-23,
डिस्चार्ज-26, संशयित-28,डॉक्टर्स – 27, नर्सिंग स्टाफ-54

Recent Posts