महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लातूर प्रशासन काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधची पूर्ण अंमलबजावणी व्हावी म्हणून लातूर पोलीस दिवस रात्र रस्त्यावतरी आपले कर्तव्य बजावत आहेत तरी लोक निष्काळजी पणाने बाहेर फिरत आहेत असे चित्र सध्यातरी दिसत आहे याचाच परिणाम पाहता लातूर पोलिस दलातील बरेच पोलीस पॉजिटीव्ह निघाले आहेत लातूर पोलीस दलात कोवीड -19 केसेस 93 त्यामध्ये 2 वरिष्ठ उपअधीक्षक सह 91 पोलीस अधिकारी/अंमलदार व 16 होमगार्ड सद्यस्थितीला ड्युटीवर असताना कोरोना संक्रमित झाले आहेत. आणि जिल्ह्यात ही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत म्हणून सर्व लातूरकरांनी सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून आपल्या पोलिस बांधवांना सहकार्य करण्याचे लातूर पोलिसांकडून आवाहनही करण्यात आले . याच गोष्टींचा विचार करून किल्लारी पोलीस स्टेशन पोलिसांनी विशेषतः PSI अमोल गुंडे यांनी लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली

किल्लारी पोलीस स्टेशन ,लामजना ग्रामपंचायत व ऑन्टी कोरोना फोर्स लामजना यांचा संयुक्त विध्दमानाने कोरोना जनजागृती मोहीम उपक्रम लामजना येथे राबविण्यात आले यादरम्यान “पोलीस मास्कसह आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात आला.तसेच घरोघरी जावुन लोकांना कोरोना संसर्गाबाबत माहिती देवुन विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले व मास्क वाटप करण्यार आले यावेळी किल्लारी पोलीस स्टशेनचे PSI व सिंगम म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल गुंडे लामजना बीट जमादार सचीन उस्तुरगे लामजना सरपंच फुलारी उपसरपंच बालाजी पाटील, सदस्य नजीर पटेल,महेश सगर,राम पवार,राम कांबळे ऑन्टी कोरोना फोर्सचे मार्गदर्शक महेश बनसोडे उमेश शिन्दे ग्रामपंचायत कर्मचारी हाणमंत कांबळे,युनूस कारभारी,फराज कारभारी,सिध्देश्वर चिल्ले,दिपक राठोड संजय फुलारी,वैभव बालकुंदे ,जीवन जाधव इत्यादी जण उपस्थित होते. असा उपक्रम राबवणारे लातूर पोलीस हे राज्यात पहिले आहेत. PSI अमोल गुंडे यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.

