महाराष्ट्र

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड या विकृत मनोवृत्तीचा तीव्र निषेध – आमदार अभिमन्यू पवार

महाराष्ट्र खाकी (लातूर) – राज्यात करोनाचा फैलाव वेगानं वाढत असताना महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप नेते राज्य सरकारची सतत अडवणूक करत असल्याची सत्ताधारी महाआघाडीचे लोकप्रतिनिधी व नेत्यांची भावना झाली आहे. हीच भावना व्यक्त करताना शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. विशेषता देवेंद्र फडणवीसांना याचा समाचार औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीकाटिप्पणी अत्यंत निषेधार्ह आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राजकारण न करण्याच्या केलेल्या आवाहनाला महाविकास आघाडीचे मंत्री आणि संजय गायकवाड यांच्यासारख्या प्रवृत्तीच हरताळ फासत आहेत. आपले अपयश लपविण्यासाठी केंद्रावर आरोप केले जात आहेत. 15 लाखांच्या आसपास लसी शिल्लक असतानाही लसीची कृत्रीम टंचाई निर्माण केली जात आहे. विरोधी पक्ष राज्यासाठी रेमडीसीवीर उपलब्ध करून देत असताना मंत्रीच त्यात अडथळा निर्माण करत आहेत. हे सगळं कमी म्हणून की काय आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत गलिच्छ भाषेत विरोधी पक्षनेते व प्रदेशाध्यक्ष यांच्यावर टिप्पणी केली आहे.या विकृत मनोवृत्तीचा तीव्र निषेध. मुख्यमंत्र्यांनी भाषेचं सौजन्य न पाळणार्‍या संजय गायकवाड यांना तात्काळ माफी मागण्याचे आदेश द्यावेत.असे अभिमन्यू पवार म्हणाले आहेत.

Most Popular

To Top