महाराष्ट्र खाकी (लातूर) – पोलीस ठाणे विवेकानंद चौक रजिस्टर नंबर 56 /2021 कलम 379 34 या गुन्ह्यात अटक असणारे आरोपी
1अमोल उर्फ पप्पू भागवत शिंदे
2अजय उर्फ दुडी सुरकास पवार
3 रामाचारी बिस्किट उर्फ रामन्ना पवार
हे तीन आरोपी गांधी चौक पोलीस स्टेशन येथील कोठडीतून दिनांक 14 /04 /2021रोजी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास कोठडीचे व्हेंटिलेटर खिडकीचे गज वाकवून पळून गेले होते या संदर्भात गांधी चौक पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 245 /2021 कलम 224 34 भादवी अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे.हे सर्व आरोपी चोरी आणि घरफोडी करण्याच्या सवयीचे असून पोलीस ठाणे औसा ,भादा ,विवेकानंद चौक या पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ,
या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, लातूर शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ,पोस्टे विवेकानंद चौक गांधी चौक, MIDC पोलीस स्टेशनचे पथके नेमण्यात आली होती,यामध्ये LCB च्या पथकाने पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, विनोद चिलमे ,प्रकाश भोसले ,रामहरी भोसले ,अंगद कोतवाड, राजाभाऊ मस्के, खुरम काजी, यशपाल कांबळे ,रवी गोंदकर भागवत कटारे ,सुधीर कोळसुरे , सिद्धेश्वर जाधव ,सचिन मुंडे यांनी यानी विशेष परिश्रम घेऊन यातील आरोपी अजय उर्फ दूडी सुरकाश पवार याला धानोरी जिल्हा उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले आहे इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे आणि ते दोन आरोपी लवकरच ताब्यात घेतले जातील.