महाराष्ट्र खाकी (लातूर) – सोशल मीडिया द्वारे एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट दिसून आली त्यामध्ये एक व्यक्ती हातात तलवार घेऊन फोटो काढून ते फेसबुक वर पोस्ट करून त्यावर “थोडे दिवस थांबा शेठ, येणारी वेळ सांगेल की मी काय करू शकतो” असे कॅप्शन टाकून तलवारी सहित एक फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याचे दिसून आले हे. त्यावर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व त्यांच्या टीमने सदर व्यक्तीचा शोध घेतला आणि ही व्यक्ती वैशाली नगर ते बाभळगाव जाणारे रोडवर रोडवर मिळून आला.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव- उमेश गणेश पेंदुर वय 27 वर्ष राहणार – वैशाली नगर लातूर, त्याच्याकडून फेसबुक वर तलवारी सहित पोस्ट फोटो मधील तलवार त्याच्याकडून जप्त करण्यात आली.
उमेश गणेश पेंदुर याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रवी गोंदकर यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे विवेकानंद येथे गुरन 227/2021 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा व 135 मुंबई पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास विवेकानंद पोलिस स्टेशनचे पोलीस अमलदार जागीरदार हे करत आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार खुर्रम काझी ,रवी गोंदकर,यशपाल कांबळे यांनी पार पडली.
चाकू,तलवार,खंजर,गुप्ती यासारखे धारदार शस्त्र बाळगणे बेकायदेशीर असून असे आढळून आल्यास संबंधितावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कठोर कारवाई होऊ शकते याकरिता कोणाही व्यक्तीने अशा प्रकारचा प्रयत्न करू नये असे आवाहन लातूर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.