लातूर जिल्हा

लातूर शहरातील तिन शिक्षण संस्था चालकांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांचे आदेश धाब्यावर बसवले !

महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोना संक्रमणात लातुर टॉप टेन मध्ये जाण्यासाठी काही खाजगी संस्थेचा हातभार लावत आहेत का ? असा प्रश्न उपस्तित होत आहे.कोरोना ची दुसरी लाट नव्या जोमात असताना राज्य सरकारने कडक कारवाई करण्याची सुचना देऊन सुद्धा लातुरातील काही खाजगी शाळेत शिक्षकांना सक्ती ची उपस्थिती केली जात आहे. मग या संस्थावर कारवाई करणार कि शिक्षकांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या जीवनाशी खेळणार?लातुर मधील तुळशीराम शिंदे प्राथमिक विद्यालय येथील मुख्याध्यापिकेने तर शाळेत उपस्थित न राहणाऱ्या शिक्षकांची पगार काढली जाणार तर नाहीच उलट अनुपस्थित दाखवुन नौकरीवरुन कमी करण्याची धमकीच दिली आहे. तसेच लातुर शहरातीलच सुदर्शन माध्यमिक विद्यालय श्री नगर लातूर येथेही तीच परिस्थिती आहे. या शाळेतील शिक्षक जावळे एच. डी. हे स्वतः कोरोना ची ट्रिटमेंट चालु असताना शाळेत उपस्थित होते. याच शाळेतील मुख्याध्यापक जानेवारी महिन्यात अपघातात ठार झाले. त्या जागी तेंव्हा पासून नवीन मुख्याध्यापक नियुक्ती न केल्याने येथील शिक्षक व कर्मचारी यांच्या पगारीही बंद आहेत. याच शाळेचा कारभार संस्था चालक पाहत असल्याने नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू झाले.शहरा पेक्षा आम्ही ही मागे नाहीत असे म्हणत लातुर तालुक्यातील महापुर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातही तोच प्रकार चालू आहे. येथील नवनिर्वाचित मुख्याध्यापक स्वतः चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना अॉफलाईन परिक्षेचे मॅसेज टाकून शिक्षकांच्या मिटींग घेण्याचा धडाका लावला आहे. हे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा अनुभव घेऊन आले आहेत. या सर्व गोष्टींचा प्रशासन गांभीर्याने विचार करील का? की लातुरातील संबधीत प्रशासनाचा सरकारला, सरकारच्या धोरणांना विरोध आहे?

Most Popular

To Top