लातूर जिल्हा

लातूर व्यापारी महासंघानं दिला आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहर नगर परिषदेचे महानगर पालिकेत रूपांतर झाल्यानंतर लातूर ‘ड’  वर्ग  महापालिका असतानाही इतर महापालिकांच्या बरोबरीने शहरात कर आकारणी केली जात आहे. हे कर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. या विषयी लातूर व्यापारी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

यासंदर्भात याआधी लातूर व्यापारी महासंघाने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. शासनाच्या अवर सचिवानी पालिका आयुक्तांना रेडी रेकनरप्रमाणे कर आकारणी न करता स्थानिक पातळीवर पालिकेनं ठराव घेऊन कर ठरवावे अशा सूचना केली होती.

पालिका पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि सर्वपक्षीय नगरसेवकही गप्प आहेत. त्यामुळे हा जाचक कर रद्द करत नव्याने कर आकारणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लातूर व्यापारी महासंघानचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी दिला आहे.

Most Popular

To Top