देश

दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत 4 अतिरेकी ठार

महाराष्ट्र खाकी – दक्षिण काश्मीर भागातल्या शोपियन जिल्ह्यातल्या मणिहाल भागात आज पहाटे सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ४ अतिरेकी ठार झाले.

सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तहेर दलाने दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाचं शोध पथक आणि पोलीस दल संयुक्तपणे मणीहाल भागातल्या संशयित ठिकाणी कारवाईसाठी जात असताना अतिरेक्यांनी या दलावर गोळीबार केला, त्यावेळी ही चकमक झाली.

या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले. या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून मृत अतिरेक्यांची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. अधिक बातमीची प्रतीक्षा आहे

Most Popular

To Top