पोलीस उपनिरीक्षक अवेझ काझी यांच्या “खाकी मास्क” उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक.

महाराष्ट्र खाकी (लातूर ) – कोरोनाने सर्व जगाला बंधिस्त केले आहे. सर्व लोक त्रस्त आहेत,लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. पण सर्वांनी स्वतःची काळजी घेत आणि कोरोना पासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहेत. त्यातील प्रथम उपाय म्हणजे चेहऱ्याला मास्क लावणे. लातूर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक असलेले अवेझ काझी यांनी आपल्या वर्दीच्या रंगाचा मास्क बनवून स्वतः वापरत आहेत आणि आणि आपल्या टिमला वापरण्यास दिला आहे. म्हणजे महाराष्ट्र पोलीस आपल्या खाकी वर्दीच्या रंगाचा मास्क वापरणार असे दिसून येत आहे. अवेझ काझी यांच्या या खाकी मास्कला लातूर मधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खाकी मास्क वापरल्यामुळे एका जिम्मेदारीची जाणीव होईल अशी अपेक्षा आहे. खाकी हा नुसता रंग नसून एक जिम्मेदारी, एक कर्तव्य आहे असे अवेझ काझी म्हणतात. सध्याची परिस्थिती पाहता लोक कोरोना बाबतीत जास्त निष्काळजी दिसत आहेत. असेही लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर खूप ताण होता आणि आहे या खाकी मास्कच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक अवेझ काझी यांनी या उपक्रमातून खाकीचे कर्तव्य फक्त पोलिसांचे नसून सर्व जनतेचे आहे असे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी या उपक्रमाची सर्व स्तरातून वाह – वाह होत आहे.

Recent Posts